रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा- रणवीरसिंग गायकवाड सरकार
बांबवडे : रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती फौंडेशन आणि राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी यांच्याकडून शाहुवाडी तालुक्यातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. ” माझे कुटुंब माझी जबाबदारी ” या कार्यक्रमांतर्गत काम करणाऱ्यांचा सन्मान, ह्या कार्यक्रमात हँडग्लोव्हज , सॅनिटायझर ,फेस मास्क, फेस शिल्ड आदी साहित्यांचे वाटप करून, करण्यात आले. हा कार्यक्रम युवा नेते व उदय साखर चे संचालक रणवीरसिंग गायकवाड सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. यावेळी रणवीरसिंग गायकवाड युवा शाक्ती फौंडेशन च्या नूतन अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आलेल्या समीर पाटील व उपाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आलेल्या भगवान पाटील, किरण जामदार यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला .
याप्रसंगी युवा नेते रणवीरसिंग गायकवाड म्हणाले कि, सध्या तालुक्यातील जनतेला खऱ्या अर्थाने आधाराची गरज आहे. समाजातील गरजू रुग्णांना सेवा देणारी हि मंडळी, खऱ्या अर्थाने समाजसेवा करीत आहेत. अशांचा सन्मान होणे, हि काळाची गरज आहे. जेणेकरून वाड्या वस्त्यांवर रुग्णसेवा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल. आणि रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हि बिरुदावली खऱ्या अर्थाने समर्पक होईल.
यावेळी, जि.प. सदस्य विजयराव बोरगे, राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीप्रमुख प्रकाश पाटील, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शीला पाटील, विरोधी पक्षनेते बाबासाहेब पाटील, उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर, नगरसेवक सुहास पाटील, आण्णा पळसे, नगरसेविका माया पाटील, संगीता पाटील, संगीता कुंभार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, राष्ट्रवादी युवक चे तालुकाध्यक्ष सुरज सावंत, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष सुरज बंडगर, उपाध्यक्ष राजकुमार पाटील, सुधाकर पाटील, भगवान सपाटे, उस्मान आत्तार, धनाजी पाटील, अनिकेत हिरवे, खंडू पळसे, तेजस बेंडके,गणेश गांधी, दस्तगीर आत्तार, योगेश खटावकर, राजू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.