रोजगाराच्या सुवर्णसंधी साठी संपर्क साधा : शाहुवाडी गटविकास अधिकारी वाघमारे
बांबवडे : तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान तालुका शाहुवाडी अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब गरजू व बेरोजगार यांना कौशल्यभिमुख रोजगार मिळवण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना ( DDUGKY ) सुरु आहे. तेंव्हा गरीब व गरजू विद्यार्थ्यांनी तसेच तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशा आशयाचे परिपत्रक शाहुवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री अनिलकुमार वाघमारे यांनी प्रसिद्धीस दिले असल्याची माहिती उपसभापती विजयराव खोत यांनी दिली.
या योजनेंतर्गत पुढील कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- जनरल ड्युटी असिस्टंट नर्सिंग १० वी पास, २. हॉटेल मॅनेजमेंट १० वी पास, ३. रिटेल सेल्स पर्सन १० वी पास, ४.फूड अँड बेवरेज १० वी पास, ५. फिटर १० वी पास, ६. वेल्डर १० वी पास, ७. ईलेक्टॉनिक्स १० वी पास, ८. सिक्युरिटी गार्ड ९ वी पास, ९. हाउस कीपिंग ८ वी पास, १०. इंवेंटरी क्लार्क १२ वी पास.
या योजनेंतर्गत १. मोफत राहण्याची सोय, २. मुले व मुलींकरिता स्वतंत्र हॉस्टेल ची सुविधा ३. प्रशस्त प्रॅक्टीकल लॅब, ४. हायस्पीड इंटरनेट सुविधा, ५. मोफत इंग्रजी कॉम्प्यूटर कौशल्यासाठी ट्रेनिंग ६. मोफत गणवेश २ जोडी, ७. अभ्यासासाठी मोफत पुस्तके व साहित्य, ८. ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर नोकरीची १०० टक्के हमी, SC / ST अल्पसंख्यांक व महिलांना विशेष प्राधान्य दिले जाईल.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड, २. रेशन कार्ड, ३.बँक पासबुक, ४. रहिवासी दाखला, ५. SC / ST साठी जात प्रमाणपत्र ६. बचत गटात असलेबाबत चे प्रमाणपत्र ७. पासपोर्ट साईझ ६ फोटो, ८. १० वी प्रमाणपत्र
तरी इच्छूक लाभार्थ्यांनी तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष MSRLM शाहुवाडी पंचायत समिती इथं संपर्क साधावा.