” लम्पी ” च्या प्रतिबंधासाठी समाधान दुध संघाने लसीकरणाची मोहीम उभी केली – डॉ. राहुल थोरात (वडगाव)
सरूड प्रतिनिधी : समाधान दुध संघ वडगाव थोरातांचे तालुका शाहुवाडी यांच्यावतीने लम्पी रोग प्रतिबंधाचे लसीकरण सुमारे २५०० पेक्षा अधिक पाळीव जनावरांचे करण्यात आले आहे. अशी माहिती समाधान दुध संघाचे चेअरमन अॅड. राहुल थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सध्या लम्पी रोगाचा दिवसेंदिवस प्रसार वाढत चाललेला आहे. हे लक्षात घेवून, समाधान दुध संघाने खबरदारी म्हणून शाहुवाडी, पन्हाळा, शिराळा, व कराड या तालुक्यांमध्ये मोफत लसीकरण मोहीम तीव्र केली आहे.

यामध्ये शाहुवाडी, शिराळा तालुक्यातील सभासदांच्या सुमारे अडीच हजार हून अधिक जनावरांना संघाच्या वतीने आठवड्याच्या कालखंडात मोफत लसीकरण करण्यात आले आहे. हि मोहीम या पुढील काळात देखील सुरु राहणार आहे. संघाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सभासदांच्या जास्तीत जास्त जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे.

लसीकरण मोहिमेसाठी संघाचे मॅनेजर अनिल कांबळे, डॉ. डी.एस.पाटील, डॉ.संदीप कदम, डॉ. निवास पाटील, डॉ. उदयराज चव्हाण, डॉ. अक्षय पाटील यांनी या मोहिमेत पुढाकार घेतला आहे.

खबरदारी म्हणून पाळीव जनावरांना लसीकरण करून घ्यावे. पाळीव जनावरांना तीव्र ताप, अंगावर पुरळ, व लम्पी ची लक्षणे दिसताच संबंधितांनी लवकरात लवकर संघाच्या पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांशी या मो.क्र. ९७६३५७८८७८ वर संपर्क साधावा, असे आवाहन समाधान दुध संघाचे डॉ. संदीप कदम यांनी केले आहे.