” लिंबाचा कडवटपणा, आणि गुळाचा गोडवा, आपल्याला सुख समृद्धी, भर भराटीचा व आरोग्यदायी जावो यंदाचा गुढी पाडवा…”: नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
बांबवडे : आमच्या सर्व वाचक, व्हॉट्स अॅप ग्रुप्स, जाहिरातदार, सर्व प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी हितचिंतक आणि तमाम जनतेला हे मराठी नववर्ष सुख समृद्धीचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो, ह्या एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड शुभेच्छा.

एसपीएस न्यूज हे वेब पोर्टल आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सहकार्यावरच सुरु आहे. आपल्या नि:पक्ष बातम्या , कर्तुत्ववान मंडळींचे कौतुक तर चुकीला शब्दांचे फटकारे देत आपली वाटचाल सुरु आहे.

आपण जाहिरातदार मंडळींनी केलेले सहकार्य हे निश्चितच आमची ताकद ठरत आहे. भविष्यात आपण केलेल्या सहकार्यावर आपण प्रगतीचे एक एक पाऊल पुढे टाकीत आहोत.भविष्यात मुलाखती आपण प्रसारित करणार आहोत. जेणेकरून आपल्याला अनेक गुणवंतांचे चरित्र आपल्याला पाहायला मिळतील.

याच पद्धतीने अनेक चांगल्या गोष्टींचे अनुकरण करणार आहोत. आपल्या सर्व शुभेच्छा हेच आमचे बलस्थान आहे.

पुनश्च आपणास गुढी पाडव्याच्या, मराठी नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा.
” लिंबाचा कडवटपणा, आणि गुळाचा गोडवा,
आपल्याला सुख समृद्धी भर भराटीचा व आरोग्यदायी जावो यंदाचा गुढी पाडवा…”