राजकीयसामाजिक

लिफ्ट इरिगेशन आणि एम.आय.डी.सी. च्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होईल – आमदार डॉ. विनय कोरे

बांबवडे :शाहुवाडी तालुक्यातील कडवी नदीवरून पाणी उपसा जलसिंचन द्वारे जुळेवाडी येथील सात शिवेच्या म्हसोबा याठिकाणी आणल्यानंतर पश्चिमेकडील तसेच दक्षिणेकडील शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. आणि इथल्या ओसाड जमिनीवर सोन्याचे पिके उगवतील. यासाठी आमचे यशस्वी प्रयत्न सुरु आहेत. असे प्रतिपादन विद्यमान आमदार डॉ.विनय कोरे यांनी केले.

बांबवडे इथ पाण्याची टाकी, तसेच प्राथमिक आरोग्य वर्धिनी इमारत उद्घाटन, आंगणवाडी खोली अशा विविध २ कोटी ८१ लाख रुपये  कामांचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोकुळ चे संचालक श्री कर्णसिंह गायकवाड सरकार हे देखील उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात उपसरपंच सुरेश नारकर यांनी आमदारांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली. तसेच बांबवडे सारख्या बाजारपेठेला सुलभ शौचालयाची  अत्यंत गरज असल्याचे सांगितले.

यावेळी वैभव नारकर यांनी देखील  सावकारांनी मंजूर केलेल्या कामांची माहिती दिली.

यावेळी बोलताना आमदार डॉ. कोरे पुढे म्हणाले कि, स्व. आमदार संजयदादा यांनी एम.आय.डी.सी. साठी प्रयत्न केले होते.परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यांचे स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत. त्यासाठी बजागेवाडी येथील जागा तसेच आम्बर्डे येथील जागा निश्चित करण्याचे प्रयोजन आहे. यामुळे एम.आय.डी.सी. सारखा प्रकल्प अस्तित्वात येईल.

दरम्यान येथील प्राथमिक आरोग्यवर्धिनी साठी फर्निचर, तसेच वैद्यकीय उपकरणे यासाठी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान बांबवडे येथील महादेव मंदिर हे गावाचे ग्रामदैवत आहे. इथ धोपेश्वर मंदिरासारखा  किरणोत्सव होवू शकतो. त्यासाठी गावाचे प्रयत्न आणि ठराव केल्यास ते शक्य होईल. तसेच बांबवडे बाजारपेठ इथ सुलभ शौचालय साठी १० लाख रुपये तात्पुरते मंजूर करण्यात आले असून, भविष्यात अधिक निधी सुद्धा उपलब्ध करण्यात येईल.असेही आमदार डॉ. कोरे यांनी सांगितले.

यावेळी गोकुळचे संचालक म्हणाले कि, गावाच्या विकासकामांसाठी  सावकार निधी देण्यास कधीही कमी पडत नाहीत. संजय दादा यांच्यानंतर तालुक्यात खऱ्या अर्थाने आलेली विकासकामे हि सावकार यांच्या माध्यमातून आली आहेत.

दरम्यान अभिलाष घोडे-पाटील यांचा वाढदिवस सावकार यांच्या हस्ते केक कापून करण्यात आला.

यावेळी बाबा लाड, विष्णू यादव, अनिरुद्ध कांबळे यांनी मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमास विजयराव बोरगे, सर्जेराव पाटील पेरीडकर, महादेवराव पाटील, विष्णू पाटील, रंगराव खोपडे, जयवंतराव पाटील, काळू पाटील, पांडुरंग केसरे, अमरसिंह खोत, डी.जि. कदम, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश डोंगरे यांनी केले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!