लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कोरोना समितीचे कठोर परिश्रम
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं कोरोना समितीने केलेलं लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी झालं आहे.
इथं येणारी मंडळी आसपास च्या चाळीस ते पन्नास गावातून विविध कामांसाठी येतात. त्यामध्ये कामासाठी येणारी कमी, तर फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. लोकांच्या वर्दळीमुळे सोशल डीस्टंसिंग चे तीनतेरा वाजतात. या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी बांबवडे ग्रामपंचायत कोरोना समिती ने कठोर पावले उचलली आहेत. पिशवी रोड, सरूड रोड, कडकडीत बंद करण्यात आले आहेत. तसेच गावातील प्रत्येक गल्लीत फिरून याची दक्षता घेतली जात आहे. यातूनही जर कोणी आले, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेश देण्यात आले आहेत.
यामध्ये सरपंच सागर कांबळे, उपसरपंच सयाजी निकम, ग्रामसेवक जि.एस.कमलाकर, तलाठी नसीम मुलाणी, पोलीस पाटील संजय कांबळे, सदस्य विष्णू यादव, सुरेश नारकर, अभय चौगुले, लिपिक दीपक पाटील, प्रकाश निकम,उत्तम कांबळे आणि त्यांचा कर्मचारी वर्ग, कठोर परिश्रम करीत आहेत. यामुळे बांबवडे गाव कोरोना पासून दूर ठेवण्याचा, हि मंडळी निकराचा प्रयत्न करीत आहेत. यात आरोग्य विभाग सुद्धा तितकाच सक्रीय आहे.