लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये मंगळागौरी संपन्न
शिराळा प्रतिनिधी : चिखली तालुका शिराळा येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये गणेशोत्सव निमित्त झिम्मा-फुगडी, मंगळागौरी चे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.


२ सप्टेंबर २०२२ रोजी लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये गणेशोत्सव निमित्त अनेक नात्यांची गुंफण असलेल्या मंगळागौरी कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षकवृंद यांनी सहभाग घेतला.


यामध्ये १ ली ते ८ वी या गटामधील झिम्मा, फुगडी, सुई फुई, उभा घोडा, काठवठकण आदी खेळांचे प्रकार संपन्न झाले. यामध्ये विद्यार्थीनिनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. याच बरोबर शिक्षिकांनी मंगळागौरी सणाचा आनंद लुटला.

सदर च्या कार्यक्रमाचे संयोजन सौ.एस.एस. भोसले मॅडम, तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी केले होते. कार्यक्रमास मुख्याध्यापक डी.पी. गवळी सर उपस्थित होते.