लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये ” शिक्षकदिन ” संपन्न
शिराळा प्रतिनिधी : चिखली तालुका शिराळा येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये शिक्षकदिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षकांची भूमिका पार पाडली.


‘ एक विद्यार्थी , एक शिक्षक ‘ या संकल्पनेतून शिक्षकदिन साजरा करण्यात आला.

या शिक्षक दिनाचे औचित्य साधून इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली. या विद्यार्थ्यांनी बालवाडी ते ४ थी च्या वर्गावर शिक्षकांच्या भूमिकेतून तास घेतले. यावेळी ७ वी चा विद्यार्थी यासीन सुतार यांनी मुख्याध्यापकांची भूमिका पार पाडली.


यावेळी ५ वी ते ८ वी च्या शिक्षकांनी, शिक्षकांची भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक डी. पी. गवळी यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी शिक्षक यांनी काम करत असताना येणारे अनुभव कथन केले. या सर्व विद्यार्थ्यांना शिराळकर मॅडम, आर.आर. पाटील मॅडम, प्राजक्ता यादव, साधना पाटील यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आभार कांबळे सर यांनी मानले.