लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये डॉ. कलाम यांची जयंती संपन्न
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


यावेळी शाळेत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री.गवळी सर यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी खबाले सर यांनी डॉ. कलाम यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तर विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्याविषयी आपली मनोगते व्यक्त केलीत. दरम्यान ” हात धुवा दिन ” सुद्धा साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने करण्यात आली.