लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक शाळेत वक्तृत्व स्पर्धा संपन्न
बांबवडे :शिराळा तालुक्यातील चिखली येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त शाळा अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक गवळी सर तसेच इतर शिक्षकांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपेश कांबळे यांनी केले.

शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व माझी आई या विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणे केली.
स्पर्धेचे नियोजन विभागप्रमुख भोसले मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार खबाले सर यांनी मानले.