लोकनेते फत्तेसिंगराव नाईक विद्यामंदिर मध्ये लोकमान्य तिलक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती संपन्न
शिराळा प्रतिनिधी : लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर, या विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन , तसेच देशाच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त भारत मातेच्या प्रतिमेचे सुद्धा पूजन मुख्याध्यापक डी. पी. गवळी सर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शाळेचे सहाय्यक शिक्षक रुपेश कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा यावेळी आपली मनोगते व्यक्त केलीत.

या कार्यक्रमाचे नियोजन सौ. एस.एस. भोसले व संग्राम पाटील सर,यांनी केले. यावेळी शाळेचा शिक्षकवृंद, तसेच शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.