लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यालय चिखली मध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न
शिराळा प्रतिनिधी : लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यालय चिखली तालुका शिराळा इथं देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.


देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धेसाठी ” हर घर तिरंगा ” , ” क्रांतिकारक नेता ” , ” ७५ वा अमृत महोत्सव “, ” गावातील प्रभात फेरी ” असे विषय देण्यात आले होते. पहिली ते आठवी या इयत्तांमध्ये विद्यार्थ्यांना विषय देण्यात आले होते. त्या विषयांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपली चित्रे काढली. व त्यामध्ये रंग भरण्यास सांगण्यात आले.

दि.१२ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या चित्रकला स्पर्धे मध्ये इयत्ता बालवाडी ते चौथी पर्यंत च्या विद्यार्थ्यांमध्ये रंगभरण स्पर्धा संपन्न झाली यामध्ये विद्यार्थ्यांना चित्रे देण्यात आली, आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्या चित्रांमध्ये रंग भरले.

या चित्रकला स्पर्धेचे आयोजन सौ. भोसले मॅडम यांनी केले. या स्पर्धेसाठी श्री कांबळे सर यांनी मार्गदर्शन केले. मोठ्या उत्साहात या स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धे मध्ये विजयी झालेले स्पर्धक पुढीलप्रमाणे :
बालवाडी : समर्थ सचिन साळुंखे प्रथम क्रमांक, कु. वेदिका अभिजित पाटील द्वितीय क्रमांक.
पहिली इयत्ता : कु. अनुज नितीन गोळे प्रथम क्रमांक, कु. प्रगती शहाजी चिले द्वितीय क्रमांक.
दुसरी इयत्ता : कु. कार्तिकी कृष्णात पाटील प्रथम क्रमांक, कु. विहान अभिजित हवालदार द्वितीय क्रमांक.
तिसरी इयत्ता : कु. हर्षवर्धन संतोष पाटील प्रथम क्रमांक, कु. राजवीर दिलीप पाटील द्वितीय क्रमांक.
चौथी इयत्ता : कु. आराध्या सिंगाप्पा गावडे प्रथम क्रमांक. कु. संतोष विजय हिंचगीर द्वितीय क्रमांक.
पाचवी इयत्ता : कु. राजवर्धन प्रकाश पाटील प्रथम क्रमांक, कु. अनुष्का सुनील पाटील द्वितीय क्रमांक.
सहावी इयत्ता : कु. श्रुती तानाजी पाटील प्रथम क्रमांक . कु. सृष्टी शशिकांत पाटील द्वितीय क्रमांक.
सातवी इयत्ता : कु. शिवम अशोक सुतार प्रथम क्रमांक , कु. गुरुप्रसाद आनंदराव पाटील द्वितीय क्रमांक.
आठवी इयत्ता : कु. पृथ्वीराज सचिन साळुंखे प्रथम क्रमांक, कु. सर्वेश दत्तात्रय माने द्वितीय क्रमांक.