लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये स्वातंत्र्य दिना निमित्त विविध उपक्रम संपन्न
शिराळा प्रतिनिधी : लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चिखली इथं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले होते. यामध्ये रांगोळी स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात सौ.मनिषादेवी नाईक वहिनी साहेब यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन अमर केन चे अध्यक्ष श्री भूषण नाईक व सौ मनिषादेवी नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

तसेच विद्यानिकेतन चे प्राचार्य श्री वरेकर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या उद्घाटन समारंभानंतर श्री भूषण नाईक, व सौ मनिषादेवी नाईक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यानंतर वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी.पी. गवळी यांनी या सोहळ्यास मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार विभागप्रमुख सौ. भोसले मॅडम यांनी मानले. मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.