लोकनेते फत्तेसिंग राव नाईक विद्यामंदिर चा विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न
शिराळा प्रतिनिधी : लोकनेते फत्तेसिंग राव नाईक प्राथमिक शाळा यशवंत नगर चिखली या शाळेचा शैक्षणिक वर्ष 2023 -24 मधील वार्षिक विविध गुणदर्शन कार्यक्रम शनिवार दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी लायन्स क्लब चिखली येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री सरस्वती देवी च्या प्रतिमेचे तसेच मातोश्री व कै.लोकनेते फत्तेसिंगराव नाईक( आप्पा )यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. पालक प्रतिनिधी श्री शहाजी पाटील, थेरगाव वैभव यादव ,सावर्डे युवराज माने, सरूड तसेच माता पालक प्रतिनिधी सौ.सारिका उत्तम पाटील शिंपे, व सौ.पूजा पाटील नाटोली यांचे शुभहस्ते करण्यात आले. ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
इयत्ता आठवीच्या प्रतीक्षा गायकवाड, श्रेया गायकवाड व अपेक्षा पाटील यांनी शाळेविषयी माहिती दिली. तसेच उल्लेखनीय बाबी व अहवाल वाचन केले. निहारिका पाटील हिने शुभम करोति सादर केली. आणि रेकॉर्डिंग डान्स सुरू झाले. बालवाडी ते आठवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी शंभर टक्के सहभागी झाले होते. आमच्या शाळेचे वैशिष्ट्य.कार्यक्रमात बालवाडी ची बडबड गीते, रेकॉर्ड गीते, त्यांचे उत्तम सादरीकरण करण्यात आले. अनय पाटील याने पोवाडा सादर केला. तसेच पहिली ते आठवी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची परंपरा आणि लोकधाराचे दर्शन — गोंधळ गीत, कोळीगीत ,शेतकरी गीत ,लावणी, मंगळागौर ,पंजाबी नृत्य अशा अनेकविध कलाविष्कारातून दिले. जुनी परंपरा आणि नवे विज्ञान युग यांचा उत्कृष्ट मिलाप घडवून आणलेला पहायला मिळाला. त्याचबरोबर आजच्या युवा पिढीला व्हॉट्सऍप, टीक टॉक, फेसबुक, इंस्टाग्राम ,गुगल याने जणू विळखाच घातला आहे. त्यातून उद्भोधन करणारी अशी नाटिका सादर केली. कार्यक्रमाला आमच्या मार्गदर्शिका सौ मनीषा देवी नाईक वहिनी उपस्थित होत्या. तसेच पालक बहुसंख्येने उपस्थित होते. विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन सुनील शिंदे व संतोष सर यांनी केले. संपूर्ण व्हिडिओ श्री प्रसाद पाटील नंदकुमार फोटो यांनी केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री गवळी सर व लिपिक संग्राम पाटील, सर्व शिक्षक स्टाफ, ड्रायव्हर विभाग यांचे अनमोल सहकार्याने उत्तम नियोजन करून कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला. सांस्कृतिक विभाग श्री खबाले वाय व्ही यांनीं वर्षभर काम पाहिले. शेवटी मुख्याध्यापक श्री गवळी डी.पी .यांनी सर्वांचे आभार मानले.आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.