लोकसंख्या वाढ हि जागतिक समस्या – प्रा. अभिजित पाटील
बांबवडे : लोकसंख्या वाढ हि समस्या आपल्या देशापुरती मर्यादित राहिलेली नसून, ती जागतिक समस्या झाली आहे, त्यामुळे या समस्येची जनजागृती होणे, हि काळाची गरज आहे, असे मत प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे समाजशास्त्र विभागाचे अधिव्याख्याते प्रा. अभिजित पाटील यांनी केले.

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त शिवशाहू महाविद्यालय सरूड, येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एच.टी. दिंडे उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले कि, लोकसंख्या वाढ हि समस्या अवघ्या जगाला भेडसावत आहे.विद्यार्थ्यांनी याचे गांभीर्य ओळखून याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन देखील श्री पाटील यांनी केले आहे.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात प्रा. के. एन. पाटील सरांनी लोकसंख्येचा संख्यात्मक आराखडा सांगितला.
यावेळी प्रा. अरविंद पाटील, प्रा.श्रीराम दडस, प्रा. डॉ.एल.एन. गायकवाड, राष्ट्रीय प्रशिक्षक गोरक्ष सकटे सर यांच्यासहित महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. एस.एस. मोहिते यांनी केले , तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सौ. अस्मिता बेर्डे यांनी केले.