वडगाव- कोडोली – जेऊर एसटी बस सुरु करावी – भारतीय दलित महासंघ
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यतील मलकापूर एसटी आगारातील मुक्कामी असलेली जेऊर तालुका पन्हाळा येथीळ सकाळी ९.०० वाजताची एसटी बस पुन्हा सुरु करावी, अशा आशयाचे निवेदन भारतीय दलित महासंघाच्या वतीने मलकापूर एसटी आगारप्रमुखांना भारतीय दलित महासंघाचे पन्हाळा तालुका अध्यक्ष आदिनाथ रणभिसे यांच्या हस्ते देण्यात आले.

या निवेदनात पुढे नमूद केले आहे कि, जेऊर येथे येणारी एसटी वडगाव, कोडोली, बोरपाडळे, नावली, जेऊर अशी या पूर्वी सुरु होती. या बस मुळे नावली, देवाळे, शहापूर जेऊर या परिसरातील विद्यार्थ्यांना हि बस सोयीची होती. हि बस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थिनींना अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शिवाय नोकरदार, व्यापारी, गृहिणी यांनाही त्याचा त्रास होत आहे. तसेच यामुळे खाजगी असुरक्षित वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

यामुळे मलकापूर आगारप्रमुखांनी सदर बाबींचा गांभीर्याने विचार करून, सुरक्षित प्रवासासाठी सकाळी व संध्याकाळी वडगाव- कोडोली व जेऊर या प्रवासासाठी बस सेवा सुरु करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी भारतीय दलित महासंघाचे पन्हाळा तालुका अध्यक्ष आदिनाथ रणभिसे, शाहुवाडी तालुका अध्यक्ष आकाश कांबळे आदी पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते.