वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई द्या -शाहूवाडी जनसुराज्य शक्ती
शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे वन्य प्राण्यांनकडून नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ६०००/-रु. नुकसानभरपाई शासनाने द्यावी अशा आशयाचे निवेदन शाहूवाडी जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा तालुका अध्यक्ष श्री.ए. वाय. पाटील आणि सहकारी यांच्यावतीने वन परिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम यांना दिले आहे.
शाहूवाडी तालुका ग्रामीण डोंगराळ आहे.येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असतो. सध्या तालुक्यात वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले जात आहे. ऊस, रताळी, मका, सोयाबीन, भात कडधान्य, व भाजीपाला या पिकांचे फार नुकसान होत आहे. यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. यदाकदाचित शासनाकडून मदत मिळाली,तरी ती अतिशय तुटपुंजी असते. यामुळे वन्य प्राण्यांकडून शेतीच्या होणाऱ्या नुकसानीची नुकसान भरपाई ६०००/- रु. मिळावी. असे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम यांना जनसुराज्य पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.
यावेळी ए. वय. पाटील म्हणाले कि, वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची तात्काळ नुकसानभरपाई मिळावी. दरम्यान विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांनी प्राण्यांकडून मानवी वस्तीवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न केला आहे. दरम्यान शेतीसाठी सहकारी तत्वावर उभ्या करण्यात आलेल्या पाणीपुरवठा संस्था कर्जमाफी योजनेतून वगळण्यात आल्या आहेत. त्या कर्जमाफीमध्ये बसवाव्यात. त्यामुळे शेतकऱ्यांवरील ताण थोडा कमी होण्यास मदत होईल.
यावेळी माजी जी.प.सदस्य विजयराव बोरगे,माजी पंचायत समिती सदस्य अमरसिंह खोत, युवा नेते युवराज काटकर, युवराज पाटील करंजफेण, माजी सरपंच कृष्णा पाटील. नामदेव पाटील, दत्त भोसले, स्वप्नील घोडे पाटील,यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.