वर्षश्राद्धानिमित्त शासनाला मदत : विद्यानंद यांचा सामाजिक बांधिलकीचा नवा पायंडा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विद्यानंद यादव यांनी आपले वडील स्व.मारुती बाबुराव यादव यांच्या, पहिल्या वर्ष श्राद्ध दिनानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीला, पाच हजार रुपयांच्या निधीचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश त्यांनी तालुक्याचे तहसीलदार गुरु बिराजदार यांच्याकडे सुपूर्द करून, तालुक्यात सामाजिक बांधिलकीचा नवा पायंडा पाडला आहे.
विद्यानंद यादव हे, माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. बांबवडे येथील व्यापारी असोसिएशन मध्ये ते संचालक सुद्धा आहेत. त्यांच्या वडिलांचे गेल्या वर्षी निधन झाले. यावर्षी या कोरोना काळात त्यांच्या वर्ष श्राद्धाची तिथी आली. त्यामुळे इतर सर्व गोष्टीना फाटा देवून, त्यांनी हा पाच हजाराचा धनादेश, मुख्यमंत्री सहायता निधीला देवून, सामाजिक बांधिलकी जपली आहे.