वाढदिवस हक्काच्या माणसाचा : श्री विजयराव बोरगे यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
बांबवडे : माजी जि.प.सदस्य विजयराव बोरगे पैलवान हे नाव सर्वसामान्य जनतेच्या मनात आदराने वसलं आहे. कारण कोरोना काळात याच नावाने जनतेच्या हृदयात घर केलं होतं. म्हणूनच त्यांना “आपला हक्काचा माणूस” हि बिरुदावली लागली आहे. आज २८ सप्टेंबर, त्यांचा वाढदिवस. त्यांना त्यांच्या या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
एकेकाळी श्री मानसिंग दादा यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राजकीय वाटचालीस त्यांनी सुरुवात केली होती. पण या वाटचालीत खऱ्या अर्थाने समाजकारण करत, त्यांनी सामान्य जनतेची मने जिंकली. आपल्या कर्तुत्वाने परिश्रमाने समाजाच्या खऱ्या व्यथा जाणून घेतल्या. आणि त्यावर मार्ग काढण्याचा यथोचित प्रयत्न केला. समाजकारण सोबत आध्यात्म जपत, भजनी मंडळांना भजनाच्या साहित्याचे वाटप करीत वारकरी संप्रदाय जपला. शिक्षण हे ज्ञानाचे स्त्रोत आहे. हे जाणून शाळांना पुनरुज्जीवन दिले.
माता भगिनींच्या आरोग्यासाठी बांबवडे आरोग्य वर्धिनी साठी मोठे परिश्रम घेतले. आज ते विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांच्यासोबत आपली राजकीय वाटचाल करीत आहेत. त्यांनी स्वकर्तुत्वावर ठराविक जनसमुदाय जपला आहे. म्हणूनच त्यांना “आपला हक्काचा माणूस ” या नावाने ओळखले जात आहे. अशा समाजशील व्यक्तिमत्वाचा हा वाढदिवस निश्चितच स्मरणात न राहील, तरच नवल. म्हणूनच त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना पुनश्च उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.