वारकरी पंथातील ” नामू मामा ” कालवश
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील नामदेवराव बाबुराव जाधव (महाराज ) वय ८० वर्षे यांचे दि. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
नामदेवराव जाधव महाराज म्हणजे आमच्यासाठी नामुमामा , एक हाडाचा शेतकरी आणि मितभाषी व्यक्तिमत्व . आपले रान आणि पांडुरंग यांचा ते एक मिलाप होते. आमच्यादृष्टीने संत सावतामाळी यांच्यासारखे त्यांचे व्यक्तिमत्व होते. अशा व्यक्तिमत्वाच्या निधनाने बांबवडे गावावर शोककळा पसरली.
त्यांच्या पश्चात पत्नी मुली, मुलगा, सून ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.