” विघ्नहर्ता डीजीटल ” चा आज तिसरा वर्धापनदिन
बांबवडे : आज तरुण नोकरी पेक्षा व्यवसायाकडे वळू लागले आहेत. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. कारण काही वर्षांपर्यंत तरुण नोकरीसाठी कासावीस व्हायचे. परंतु सध्या तरुण व्यावसायिक बनत आहेत. खुटाळवाडी येथील एक तरुण गेले चार वर्षे आपल्या व्यवसायात धडपडत होता. परंतु आज तोच तरुण यशस्वी व्यावसायिक झाला आहे. त्या तरुणाचे नाव आहे. प्रकाश चव्हाण . त्यांनी ” विघ्नहर्ता डीजीटल ” नावाचा फ्लेक्स प्रिंटींग चा व्यवसाय खुटाळवाडी इथं सुरु केला होता. आज त्याचं व्यवसायाचा आज तिसरा वर्धापन दिन आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने हार्दिक अभिनंदन.आणि त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
हा दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस असतो. याचदिवशी आनंद व्यक्त करताना अनेक तरुण मंडळी अवाढव्य खर्च करीत असतात. परंतु प्रकाश चव्हाण या दिवशी शाहुवाडी येथील अनाथ आश्रमात जावून, मुलांसाठी गरजेचे असलेले किराणा सामान त्या आश्रमाला भेट म्हणून देतात. यातून त्यांची समाजाविषयी असलेली बांधिलकी समोर येत आहे. आणि ते हि बांधिलकी व्यवस्थित जपत आहेत. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे.

त्यांनी खुटाळवाडी सारख्या ग्रामीण भागात व्यवसाय सुरु केला आणि वाढवला सुद्धा. हि गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण व्यवसाय वृद्धी करण्यासाठी जागा कुठे आहे, हे महत्वाचे मानले जाते. परंतु हा जिगरबाज तरुण अनेक अडचणींना तोंड देवून, आपला व्यवसाय यशस्वीरीत्या सांभाळत आहे. अशा जिगरबाज तरुणाचे मनापासून अभिनंदन.आणि शुभेच्छा देखील.