विजयादशमी च्या मुहूर्तावर बांबवडे त ” शंभू हॉस्पिटल ” चे उद्घाटन
बांबवडे :बांबवडे तालुका शाहुवाडी इथं विजयादशमी च्या मुहूर्तावर ” शंभू हॉस्पिटल ” चे उद्घाटन संपन्न झाले.
डॉ. प्रविणकुमार पाटील यांनी हे हॉस्पिटल सर्व सोयींनीयुक्त उभे केले असून, रुग्ण सेवा तत्पर देण्यात डॉ. प्रवीण पाटील यांचा हातखंडा आहे. त्याचबरोबर रुग्णांना तत्पर सेवा देण्याची ग्वाही त्यांनी आपल्या स्वागतपर भाषणात दिली.
या कार्यक्रमप्रसंगी येथील बहुतांश नामांकित डॉक्टर्स उपस्थित होते.

यावेळी डॉ. महेश पाटील एम.बी.बी.एस.( डी.सी.एच.) यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी ” बांबवडे, सरूड डॉक्टर्स असोसिएशन ” चे अध्यक्ष डॉ. जयवंत पाटील बी.एच/एम.एस.यांच्या हस्ते ओपीडी विभागाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले, तर डॉ. सुभाष पाटील बी.ए .एम.एस. यांच्या हस्ते वेटिंग एरिया चे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर डॉ.गुरुनाथ दळवी (ऑर्थॉ ) यांनी ई.सी.जी. रूम चे उद्घाटन केले, तर डॉ. अमोल शिरगुप्पे स्त्री रोग तज्ञ , डॉ.वाय.ए. यादव बी.ए.एम.एस. यांनी ड्रेसिंग रूम चे उद्घाटन केले.

या कार्यक्रमावेळी डॉ.एस.आर. पचकर एम.बी.बी.एस., डॉ. एस.एस.यादव बी.ए.एम.एस., डॉ. बलसाने एम.बी.बी.एस.स्त्री रोग तज्ञ यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास डॉ. अभिजित जानकर एम.एस., डॉ.उत्कर्ष किटे एम.बी.बी.एस. डी.सी.एच., डॉ. उत्तम पाटील बी.ए.एम.एस., डॉ. संदीप पाटील बी.ए.एम.एस. , डॉ. विजय सावत बी.एच.एम.एस., डॉ. नामदेव खाडे बी.ए.एम.एस., डॉ.रमेश पचकर बी.ए.एम.एस., डॉ. विनायक पाटील बी.ए.एम.एस. आदी डॉक्टर वृंद कार्यक्रमास उपस्थित होते. तर बांबवडे गावचे सरपंच सागर कांबळे, उपसरपंच सयाजी निकम यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या.