विजेचा शॉक लागून दोन तरुण शेतकरी जागीच ठार : कोपार्डे येथील घटना
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ): कोपार्डे तालुका शाहुवाडी येथील दोन सख्ख्या भावांचा शेतात विजेचा शॉक लागून, जागीच मृत्यू झाला. सदर घटना आज दि. ३ जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजनेच्या दरम्यान घडली. सदर घटनेची शाहुवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सदर ची माहिती कोपर्डे पोलीस पाटील अनिल चौगुले यांनी दिली.
याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, येथील सुहास कृष्णा पाटील ( वय ३७ वर्षे ), स्वप्नील कृष्णा पाटील वय ३२ वर्षे ) हे दोन्ही सख्खे भाऊ कोपार्डे येथील कडवी, शाळी नदी च्या संगम फाटा येथील शेतात घडली. हे भाऊ शेतात खत टाकावयास गेले होते. खत टाकत असताना शेतात असलेल्या विजेच्या खांबाचा स्टे वायर म्हणजेच ताण असलेल्या लोखंडी तारेस स्पर्श झाला, आणि त्यास विजेचा शॉक लागला. त्याला वाचवावयास त्यांचा भाऊ गेला असता, त्याला देखील शॉक लागला. दरम्यान त्यांचा तिथेच मृत्यू झाला.
सदर घटनेची पाहणी करण्यासाठी वीज वितरण कंपनी चे कुंभारे साहेब,तसेच काटकर साहेब यांनी घटनास्थळाला भेट दिली. पंचनामा केल्यानंतर शव विच्छेदन करण्यासाठी मृतदेह मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान सुहास पाटील यांना ४ वर्षांची लहान मुलगी आहे. दरम्यान या घटनेमुळे गावात व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वीज वितरण कंपनी च्या हलगर्जीपणामुळे हि दुर्घटना घडली असल्याची चर्चा ग्रामास्थातून होत आहे. तसेच सदर मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी देखील ग्रामस्थ करताना ऐकावयास मिळत आहे.