educationalसामाजिक

विज्ञान प्रदर्शनात लोकनेते फत्तेसिंगराव नाईक विद्यामंदिर चा उत्स्फूर्त सहभाग


शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुकास्तरीय ४९ व्या विज्ञान प्रदर्शनात चिखलीच्या लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर ने आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.


सध्याच्या आधुनिक आणि वैज्ञानिक युगात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय शिक्षकांनी राबविलेल्या या उपक्रमात १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग घेतला.


यामध्ये जल शुद्धीकरण यंत्र, वॉटर सप्लायर विदाउट लाईट, मिठावर विद्युत निर्मिती, घरगुती ATM असे प्रयोग सादर करण्यात आले.


यामध्ये विज्ञान शिक्षक सौ साधना पाटील, व प्राजक्ता यादव यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी मुख्याध्यापक डी.पी. गवळी, संग्राम पाटील व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!