विद्यामंदिर सावे ला जिल्हा परिषद चा ” स्वच्छ विद्यालय पुरस्कार ” प्राप्त
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील सावे येथील सावे विद्यामंदिर ला जिल्हास्तरावरील स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळाला असून, विद्यालयावर ग्रामस्थांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने विद्यामंदिर सावे चे हार्दिक अभिनंदन .

हा पुरस्कार राज्य सरकार पुरस्कृत असून, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते देण्यात आला आहे.

ह्या पुरस्कारासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद, शाळेला नेहमीच सहकार्य करणारी शाळा व्यवस्थापन समिती , त्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच शाळेस भौतिक सुविधांनी परिपूर्ण बनविणारे सरपंच, उपसरपंच ,सर्व सदस्य, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सावे, तसेच शाळेस मदत करणारे सर्व माजी विद्यार्थी, व ग्रामस्थ या सर्वांचेच सहकार्य लाभले.