विद्यार्थ्यांच्या पायाभूत प्रगतीसाठी प्रगत माझा वर्ग अभियान महत्वपूर्ण : बाजीराव देशमुख
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर):विद्यार्थ्यांच्या पायाभूत प्रगतीसाठी ” प्रगत माझा वर्ग “अभियान महत्वपूर्ण आहे. या अभियानात प्रत्येक विद्यार्थ्याच्या शंभर टक्के प्रगतीसाठी शिक्षकांनी अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रगत माझा वर्ग अभियानाचे प्रणेते, शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख यांनी केले.
कोकरूड तालुका शिराळा येथील मॉडेल स्कूलमध्ये कोकरूड, नाठवडे, रिळे, प.त. शिराळा केंद्रातील सर्व शिक्षकांची एक दिवसाची, प्रगत माझा वर्ग अभियान कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निवृत्त केंद्रप्रमुख आलिशा मुलानी होते.
प्रारंभी दीप प्रज्वलन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या कार्यशाळेत शंभर शिक्षकांनी भाग घेतला.
सचिन फल्ले ,श्रद्धा पाटील, शुभांगी शिंदे, युनूस मणेर बाजीराव पाटील, शिवाजी पाटील, नामदेव गुरव, मंजुषा परदेशी, सोमनाथ तेलंग, स्नेहलता घाडगे, बाबाजी बानकर, उत्तम पवार, मनोहर कांबळे, दीपक रोकडे या उपक्रमशील शिक्षकांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
यावेळी आलिशा मुलाणी म्हणाले, २०१८ पासून या अभियानाच्या माध्यमातून पाढे पाठांतर आणि इंग्रजी शब्द पाठांतर हे उपक्रम ताकदीने राबवले जात आहेत. या अभियानास विद्यार्थी आणि पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
स्वागत मुख्याध्यापक संजय दिवे यांनी केले. प्रस्ताविक दीपक रोकडे यांनी केले. आभार प्रकाश जाधव यांनी मानले.
यावेळी केंद्रप्रमुख रवींद्र लोंढे, सांगली जिल्हा कलाकार मानधन समितीचे सदस्य अनंत सपकाळ, शिक्षक संघाचे नेते शंभुराजे पाटील, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट, प्रताप गायकवाड, संजय गुरव, प्रकाश यादव, संजय कुंभार, संजय रोकडे, नंदकुमार पाटील, सत्यजित यादव, जगन्नाथ कुलकर्णी, कृष्णा सावंत, शांताराम तराळ, नीता पाटील, सुनिता पाटील, आणि नूतन मोहिते, प्रतिभा दळवी, मायादेवी पाटील, रेश्मा भंडारे, कीर्ती गायकवाड उपस्थित होते.