विद्रोही लिखाणाबद्दल प्रा. नाईक यांना धमकी
बांबवडे : विद्रोही कविता च्या लिखाणाबद्दल सरूड तालुका शाहुवाडी येथील प्रा. प्रकाश नाईक यांना फोन वरून धमकी दिली आहे. याबाबत शाहुवाडी पोलीस ठाणे इथं तक्रार दाखल केली आहे. याबाबत आज शाहुवाडी पोलीस ठाणे इथं कार्यकर्त्यांनी आज दि. २० जून रोजी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रा. प्रकाश नाईक हे व्याख्याते आहेत. त्याचबरोबर आंबेडकर चळवळीतील ते खंदे समर्थक आहेत. त्यांच्या अनेक विद्रोही कविता आहेत. सध्याच्या वास्तवतेबाबत प्रा.प्रकाश नाईक यांनी विद्रोही कवितेचे लिखाण केले आहे. याबाबत कर्नाटकातील एका इसमाने त्यांना फोन करून धमकी दिली आहे.

याबाबत प्रा. नाईक म्हणाले कि, मी चळवळीतील कार्यकर्ता असून, माझी हत्या झाली तरी, मी अशा धमक्यांना भीत नाही. माझे विद्रोही लेखन सुरूच राहणार आहे.

सदर बाबत शाहुवाडी पोलीस ठाणे इथं तक्रार देण्यासाठी त्यांच्या सोबत शेकाप चे भाई भारत पाटील, प्रकाश कांबळे, एस.टी. नलवडे, प्रा. राज गायकवाड, संदीप कांबळे, अशोक गायकवाड, शंकर कांबळे, राकेश कांबळे, प्रा. निलेश घोलप, जगन्नाथ नलवडे, हनुमंत कवळे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.