विधवा प्रथा बंद करण्यासाठी ठराव करावा -जि.प.स. विजयराव बोरगे
बांबवडे: शाहुवाडी तालुक्यातील पिशवी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य मंडळांनी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव करून, विधवा महिलांचा होणारा अपमान, लाजिरवाणे जिणे जगण्यास प्रतिबंध करून, अनिष्ट रूढींना पायबंद घालावा, असे आवाहन पिशवी जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य श्री विजय गंगाधर बोरगे पैलवान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

पती चे निधन झाल्यानंतर महिलेला अनेक बंधने पाळावी लागतात. त्यांनी कुंकू लावायचे नाही, टिकली लावायची नाही सौभाग्य अलंकार घालायचे नाहीत. अशी अनेक बंधने त्या विवाहितेवर लादण्यात येतात. त्यामुळे त्या विधवा महिलेचे जिणे लाजिरवाणे होते. तसेच त्या महिलेला समाजात स्थान मिळत नाही.

या अनेक रूढींमुळे महिलांच्या नैसर्गिक हक्कांवर , तसेच अधिकारांवर गदा येत आहे. त्यामुळे आपल्या गावात तसेच देशात विधवा महिलांना इतर महिलांप्रमाणे जगता यावे, यासाठी या विधवा प्रथा बंद व्हाव्यात, यासाठी आपल्या सर्वांच्या ग्रामपंचायती चे योगदान या चळवळीत असावे. यासाठी या अनेक अनिष्ट रूढी बंद करण्यामध्ये आपला एक ठराव महत्वाचा ठरणार आहे. तेंव्हा या प्रथा बंद करण्यासाठी आपल्याला आवाहन आहे. असे मत जि.प.स. श्री विजयराव बोरगे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.यांनी