विरळे च्या सरपंचांची अभिमानास्पद कामगिरी
कांडवण : शाहुवाडी तालुक्यातील कांडवण येथील प्रकाश दगडू कांबळे यांचा वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना अंतर्गत माजी बांधकाम व आरोग्य सभापती श्री सर्जेराव पाटील पेरीडकर यांच्या हस्ते दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यासाठी येथील तत्पर सरपंच कृष्णा गणपती पाटील यांनी पाठपुरावा करून आपले कर्तव्य पार पाडले.
यासाठी कृषी अधिकारी अभिजित दिढे, श्री सोनावणे, दत्तात्रय अवताडे, तलाठी सुप्रिया काशीद, सर्कल मोहन जाधव, चेअरमन बयाजी पाटील यांनी प्रयत्न केल्यामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे.