विशाळगड चा एक बुरुज ढासळला : ऐतिहासिक वास्तूंची जोपासना गरजेची …
मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ): शाहुवाडी तालुक्यातील ऐतहासिक अस्तित्व जपून असलेल्या विशाळगड किल्ल्याचा आज दि.१४ जुलै २०२२ रोजी सकाळी ढासळला. सुमारे साडेतीनशे वर्षांपासून आपले अस्तित्व शाबूत ठेवणारा हा बुरुज आज मात्र ढासळला, आणि ऐतहासिक वास्तूंची जोपासना करायला हवी, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे, याची इतिहासप्रेमी जनतेने नोंद घेणे , हि काळाची गरज ठरत आहे.

विशाळगडावर जाण्यासाठी जुन्या लोखंडी पुलाजवळ असणारा बुरुज ढासळला. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने , पर्यटकांची संख्या कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गडावर ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात आला आहे.