विशाळगड संकटात यास्तव ” चलो विशाळगड ” : संभाजीराजे यांचे आवाहन
बांबवडे : संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आंदोलन पुकारले असून हजारो शिवभक्त आज विशाळगडावर दाखल होण्याचे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.
शाहुवाडी तालुक्यातील ऐतिहासिक महत्व अधोरेखित करणारा किल्ले विशाळगड सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. हे अतिक्रमण गेले अनेक वर्षे सुरु असून, याबाबत प्रशासनाला अनेकवेळा जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु प्रशासनाने याकडे कानाडोळा केला होता. यास्तव आज संभाजीराजे किल्ले विशाळगडावर हजारो शिव्भाक्तांसह दाखल होणार असल्याचे समजते.
परंतु अनेकवेळा इशारा देवूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आज विशाळगड अतिक्रमणमुक्त आंदोलन करण्यावर संभाजीराजे ठाम असून, ” चलो विशाळगड ” चे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.