विश्वासराव साखर कारखान्याचे रोलर पूजन संपन्न
बांबवडे : चिखली तालुका शिराळा येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते गळीत हंगाम २०२२-२३ साठी आज दि.१३ जून रोजी रोलर पूजन संपन्न झाले.

आमदार नाईक यांच्या हस्ते विधीवत पूजन होवून रोलर बसविण्यात आला.याप्रसंगी अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


कार्यक्रमास उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्यसह संचालक सर्वश्री विराज नाईक, दिनकरराव पाटील सुरेश पाटील, विजयराव नलवडे, बाबासाहेब पाटील, सुरेश चव्हाण, डॉ.राजाराम पाटील, विश्वास कदम, यशवंत निकम, शिवाजी पाटील, विष्णू पाटील, अजितकुमार पाटील, हंबीरराव पाटील, तुकाराम पाटील, यशवंत दळवी, बाळासाहेब पाटील, सुहास पाटील, बिरू आंबरे,संदीप तडाखे, आनंद पाटील, सुकुमार पाटील, संभाजी पाटील, दत्तात्रय पाटील, विश्वास पाटील, कोंडीबा चौगुले, यांच्यासह प्रभारी कार्यकारी संचालक दिपक पाटील, सचिव सचिन पाटील, अरुण साळुंखे, यु.जि. पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष टी.एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजय देशमुख, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, सभासद , कर्मचारी आदी मंडळी उपस्थित होती.