congratulationsसामाजिक

वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान समाजाच्या दृष्टीने गरजेचा-सौ. वैशाली बोरगे


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील बोरगे पैलवान गुरुजी सभागृहात,कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनेच्या शाहुवाडी पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.


या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाहुवाडी तालुका महिला कॉंग्रेस कमिटी च्या अध्यक्षा सौ. वैशाली बोरगे साळशीकर होत्या.


यावेळी शाहुवाडी स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनेच्या अध्यक्ष पदी सुभाष कुराडे सरूड, यांची तर उपाध्यक्ष पदी मलकापूर चे महेंद्र मोरे यांची निवड करण्यात आली.


यावेळी अन्य निवडी सुद्धा संपन्न झाल्या. यावेळी संघटनेच्या सचिव पदी सुरेश कापसे (पिशवी ) , यांची तर खजिनदार पदी बांबवडे चे दिपक लाटकर यांची, निवड करण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. बोरगे यांच्या हस्ते पदाधिकारी यांचा शाल ,फेटे, बांधून सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी अनिल कारंडे शाहुवाडी , राहुल अडीलकर बांबवडे, यांचाही पत्रकार सुभाष बोरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यावेळी सौ. बोरगे म्हणाल्या कि, वृत्तपत्र विक्रेता हा समाजाचा असा एक घटक आहे, जो ऊन, वारा, पाऊस यांची तमा न करता, घरोघरी वृत्तपत्र पोहचवण्याचे काम इमाने-इतबारे करीत असतो. म्हणूनच या मंडळींचा सन्मान हे आपले कर्तव्य आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे., असेही सौ . बोरगे यावेळी म्हणाल्या.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!