“ व्यापारी असोसिएशन बांबवडे ” ने जपलीयं सामाजिक बांधिलकी
बांबवडे : व्यापारी असोसिएशन बांबवडे तालुका शाहुवाडी यांच्यावतीने शाहुवाडी तालुक्यातील कोरोना रुग्णालयांसाठी १ लाख रुपयांचे साहित्य तहसीलदार गुरु बिराजदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी अनिल वाघमारे देखील उपस्थित होते.
बांबवडे येथील व्यापारी वर्ग नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत आला आहे. त्यांनी तो पायंडा पुढे चालवला आहे. गेले दोन महिने शासनाला योग्य प्रतिसाद त्यांनी दिला आहे. सध्या देश, राज्य, जिल्हा, आणि शाहुवाडी तालुक्यावर सुद्धा कोरोना कहर तुटून पडला आहे. अशावेळी बांबवडे व्यापारी असोसिएशन च्या वतीने १ लाख रुपयांचे साहित्य तहसीलदारांकडे सुपूर्द करून, पुन्हा एकदा माणुसकीची जाणीव, आपल्या कृतीतून सिद्ध केली आहे.
यावेळी बाळासाहेब खुटाळे, रवींद्र फाटक, शरद बाऊचकर, रवींद्र पाटील, दत्तात्रय यादव, दत्तात्रय शेळके, विद्यानंद यादव, प्रकाश पाटील आदी व्यापारी उपस्थित होते.