शाहुवाडीत वाढलेले मतदार संघ जनतेला आणि पुढाऱ्यांना त्रासदायक ?
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात एका जि.प. मतदार संघात वाढ झाली असून, पंचायत समिती च्या दोन गणात वाढ झाली आहे. यामुळे तालुक्यातील लोकप्रतिनिधींमध्ये खळबळ उडाली आहे.

तालुक्यात पूर्वी चार जि.प. मतदारसंघ, आठ पंचायत समितीचे गण होते. यामध्ये एक जि.प. मतदारसंघाची वाढ झाली आहे, तर दोन पंचायत समिती चे गण वाढले आहेत. यामुळे अनेक गावे या मतदारसंघातून त्या मतदारसंघात घातली गेली आहेत. यामुळे ज्यांचे संबंध ज्या गावांमध्ये होते, ती गावे दुसऱ्या मतदारसंघात गेल्यामुळे, पुन्हा नवी जुळणा नव्या उमेदवाराला करावी लागणार आहे. हि चिंतेची बाब ठरत आहे.

यामुळे तालुक्यातील लोकप्रतिनिधींना देखील वेगळी मांडणी करावी लागणार आहे. गटातील अनेक कार्यकर्ते एकीकडून दुसरीकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नेतृत्वाला कार्यकर्ते राखून ठेवण्यासाठी वेगळी आखणी करावी लागणार आहे.

एकंदरीत काय, तर पुढारी मंडळींना हा वाढलेला मतदार संघ डोकेदुखी ठरत आहे.