शाहुवाडी चा निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून वरदान ठरणार- खासदार धैर्यशील माने
बांबवडे ( दशरथ खुटाळे ) : शाहुवाडी तालुका निसर्ग संपन्न आहे. याचा उपयोग येथील जैव विविधता जपून पर्यटनासाठी केल्यास तालुक्याला हा निसर्ग एकप्रकारे वरदान ठरणार आहे. यासाठी अधिकारी,प्रशासन, त्या त्या ठिकाणाचे ग्रामस्थ आणि व्यावसायिक या सगळ्यांनी एकत्र येवून संगनमताने काम करणे, गरजेचे आहे. असे मत खासदार धैर्यशील माने यांनी आंबा येथील झालेल्या प्रशासन, ग्रामस्थ, व्यावसायिक यांच्या बैठकीत व्यक्त केले.

आंबा तालुका शाहुवाडी इथं फॉरेस्ट अधिकारी, याचबरोबर पर्यटनाशी निगडीत असलेल्या अधिकारी ग्रामस्थ तसेच विशाळगड येथील दर्गा समिती, हॉटेल व्यावसायिक तसेच निसर्गप्रेमी मंडळींना या बैठकीसाठी निमंत्रित केले होते.

यावेळी अनेकांनी आपली मते मांडली. हॉटेल व्यावसायिकांनी विशाळगड इथं येणाऱ्या भाविकांबद्दल मते मांडली.

तसेच फॉरेस्ट अधिकारी यांनी पर्यटनासाठी आवश्यक असलेले मुद्दे मांडले. त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांनी सुद्धा अनेक उपाय सुचवले. तसेच विशाळगड येथील दर्गा समितीने सुद्धा आपली मते मांडली. त्याचबरोबर आंबा – विशाळगड रस्त्यावर चेक पोस्ट बसविण्यात यावा, असेही सुचविण्यात आले.

आंबा परिसरातील जंगलातील प्राणी संपत्ती जपली पाहिजे. विशेष म्हणजे येथील ” वाघ ” जपला पाहिजे. वाघ शिवसेनेचे अस्तित्व दाखवतो. त्यामुळे वाघ जपला पाहिजे बरं का ! असे म्हणताच बैठकीत हशा पिकला.

हि प्राथमिक बैठक असून, अशीच बैठक होईल, यापुढे त्यानंतर विचारविनिमय करून यावर योग्य निर्णय घेवू, असेही खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी सांगितले.