राजकीयसामाजिक

शाहुवाडी चा भगवा दिल्लीत फडकणार ?

बांबवडे : लोकसभा निवडणुकांच्या निकालात हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी चे उमेदवार व शिवसेनेचे माजी आमदार श्री सत्यजित पाटील सरुडकर हे आत्तापर्यंत झालेल्या फेऱ्यापर्यंत  आघाडी    वर असून, शाहुवाडी चा भगवा दिल्लीत फडकणार असल्याचे सुतोवाच होताना दिसत आहे. दरम्यान आपल्या पत्नीचा वाढदिवस असतानाही मैत्री साठी केडीसिसी बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड हे मत मोजणी स्थळी आवर्जून दाखल आहेत.

माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर हे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे विश्वसनीय शिलेदार आहेत. यांच्या सहकार्यामुळेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने विजयी झाले होते. परंतु त्यांनी शिवसेनेशी केलेली गद्दारी हे या मतदारसंघातील जनतेला रुचलेली नाही. त्यामुळेच सत्यजित पाटील पहिल्या फेरी पासूनच आघाडीवर आहेत. सत्यजित पाटील यांच्या सद्यस्थितीतील निकालामुळे शाहुवाडीला दिवंगत माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड साहेब यांच्यानंतर पहिल्यांदाच खासदारकी मिळणार असल्याचे सुतोवाच होत आहे. यामुळे शाहुवाडी त जल्लोषाचे वातावरण निर्माण होवू लागले आहे. एकंदरीत सध्याच्या या फेरीपर्यंत पाहिले असता , सात्याजीत आबा च गुलाल उधळणार असे चित्र शाहुवाडीत निर्माण झाले आहे.
जर असे घडले तर शिवसेनेची मशाल दुसऱ्यांदा शाहुवाडीत उजळणार , आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेली शिवसेनेवरची निष्ठा दिसून येत आहे. तसेच महाविकास आघाडी म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने काम केल्याचे समोर येत आहे.२०२३ मध्ये शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी श्रीमती ऋतुजा लटके या पहिल्यांदा मशाल चिन्हावर निवडून आल्या. त्या जरी मुंबई तून निवडून आल्या, तरी त्यांचे मूळ गाव शाहुवाडी तालुक्यातील शेंबवणे हे आहे. त्यानंतर सत्यजित आबा यांनी देखील मशाल चिन्हावर निवडणूक लढवली आहे. यातून जनता आपल्या पक्षावर निष्ठा आणि स्वाभिमान कसा असतो, हे यातून दर्शवते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!