शाहुवाडी च्या सूनबाईंना अंधेरीच्या रिंगणात विजयी करा- संपर्कप्रमुख आनंदराव भेडसे
बांबवडे प्रतिनिधी : सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या मुंबई मधील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शाहुवाडी च्या सुनबाई श्रीमती ऋतुजा रमेश लटके या खंबीरपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून, मशाल या चिन्हावर निवडणूक लढत आहेत. त्यांना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पाठींबा जाहीर केला असून, एकंदरीत त्या महाविकास आघाडी च्या उमेदवार म्हणून हि निवडणूक लढवीत आहेत. त्यांना या निवडणुकीत तालुक्यातील मुंबईस्थित असलेल्या नागरिकांनी मतदान करून, तालुक्याच्या सूनबाईंना प्रचंड मतांनी निवडून आणण्यास हातभार लावावा, असे आवाहन संपर्कप्रमुख आनंदराव भेडसे यांनी केले आहे.

सध्या राज्यातील मुंबई येथील अंधेरी पोटनिवडणूक अतिशय चुरशीची होत आहे. या जागेवर शाहुवाडी तालुक्यातील शेंबवणे येथील दिवंगत रमेश लटके यांनी २०१९ ला निवडणूक लढून ते जिंकले होते. दरम्यान च्याकाळात त्यांच्या निधनाने हि जागा रिक्त झाली. आणि त्या जागेची निवडणूक लागली. एकंदरीत बहुतांश वेळा अशा जागा बिनविरोध दिल्या जातात.

परंतु सध्याची राजकीय स्थिती पाहता, भाजप ने याठिकाणी आपला उमेदवार दिला आहे. याठिकाणी दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने निवडणूक लढत आहेत. तेंव्हा अंधेरी पूर्व मतदारसंघात शाहुवाडी तालुक्यातील जे नागरिक मतदार असतील, त्यांनी या महाविकास आघाडी च्या उमेदवाराला मतदान करून शाहुवाडी तालुक्याची शान राखावी, असे आवाहन देखील आनंदराव भेडसे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केले आहे.