शाहुवाडी टाईम्स चे संपादक श्री मुकुंद पवार यांना कोल्हापूर जिल्हा परिषद चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
बांबवडे ( दशरथ खुटाळे ) : साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स , व एसपीएस न्यूज चे संपादक तसेच शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकुंद चंद्रकांत पवार यांना कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या वतीने देण्यात येणारा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. पवार सरांचे मनापासून आभिनंदन. तसेच याबाबत ची पहिली आनंदाची बातमी जिल्हा परिषद सदस्य श्री विजयराव बोरगे यांनी दिली, याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार.
श्री मुकुंद पवार हे पत्रकारिता क्षेत्रात गेली २५ वर्षे सातत्याने आपले योगदान देत आले आहेत. साप्ताहिक, दैनिक, आणि वेब पोर्टल च्या माध्यामातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचे व्रत त्यांनी आजवर जोपासले आहे. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच होत असते, अशा निगर्वी व्यक्तिमत्वाचे पुनश्च अभिनंदन.