राजकीयसामाजिक

शाहुवाडी तालुक्याच्या डोंगरकपारी पर्यंत मनसे पोहोचतेय…


उखळू प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्याचे उत्तर भागातील शेवटचे टोक असलेले गाव म्हणजे उखळू. इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नूतन शाखेचे उद्घाटन मनसे च्या माथाडी कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस महेंद्र जाधव, व जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
मनसे शाहुवाडी तालुकाअध्यक्ष श्री धनराज आगलावे यांच्या नेतृत्वाखाली या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. शाहुवाडी तालुक्यात मनसे मूळ धरू लागले आहे.. याचे हे उदाहरण आहे.
यावेळी मनसे चे माथाडी कामगार चिटणीस श्री विलास दादा वडाम, शाहुवाडी तालुका उपाध्यक्ष प्रवीण कांबळे, संभाजी आटकेकर, शित्तूर वारुण शाखेचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!