शाहुवाडी तालुक्यातील कापशी गावाच्या वारकऱ्यांचा केरीवडे इथं अपघात : जखमी मिरज रुग्णालयात दाखल
बांबवडे : सांगली जिल्ह्यातील मिरज- पंढरपूर रोड वर केरीवडे इथं वारकऱ्यांच्या दिंडीत बोलेरो गाडी घुसल्याने अपघात झाला आहे. यामध्ये जखमी झालेले वारकरी हे शाहुवाडी तालुक्यातील कापशी गावचे असल्याचे समजते.

जखमींना नागरिकांनी मिरज येथील सिविल रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात १३ वारकरी जखमी झाल्याचे समजते.