शाहुवाडी तालुक्यातील गाव चावडी इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
बांबवडे :शाहुवाडी तालुक्यातील सुमारे २२ गावातील गाव चावडी च्या इमारती बांधून एक वर्ष होवून सुद्धा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या गाव चावडी इमारती त्वरित वापरात आणाव्यात , अशा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालय, तसेच शाहुवाडी पंचायत समिती ला शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी आणि कार्यकर्ते यांनी दिले आहे.
तलाठी, कोतवाल व मंडल अधिकारी यांना शासकीय कामकाज करण्यासाठी या इमारती शासनाने बांधून दिल्या आहेत. तसेच सर्व सामान्य जनतेला सुद्धा येणे-जाणे सुलभ व्हावे, यासाठी या इमारतीचे आयोजन करण्यात आले आहे. शित्तूर तर्फ मलकापूर, सुपात्रे, सरूड, शिंपे आदी सुमारे २२ गावातून या गाव चावडी च्या इमारती बांधून सुमारे वर्ष झाले आहे. तरीसुद्धा त्यांचे लोकार्पण झाले नाही. त्यामुळे या इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या लवकरात लवकर कार्यान्वित व्हाव्यात. अशा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे. यावर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, दत्ता पोवार यांसहित अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.