शाहुवाडी तालुक्यातील १७ लोक कोरोनाबाधित
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात एकूण १७ लोक कोरोना ग्रस्त असल्याने, तालुक्यातील जनता चकित झाली आहे. यामुळे पुणे- मुंबई सारख्या शहरातून गावाकडे येणाऱ्या नागरिकांनी तपासणी करूनच यावे, असे आवाहन जनताच करू लागली आहे.
शाहुवाडी तालुक्यातील बहुतांश जनता पुणे- मुंबई सारख्या शहरात नोकरी उद्योगानिमित्त रहात आहेत, परंतु त्यांचे नातेवाईक ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे शहरातील लोक गावी येवू लागले आहेत. त्यात मे महिना म्हणजे मुंबईकरांसाठी सुट्टीचा महिना असतो. परंतु सध्याच्या कोरोना च्या संक्रमणामुळे पुणे-मुंबई शहरात राहणाऱ्या लोकांना लॉकडाऊन होवून राहावे लागले आहे. त्यामुळे घरात राहून कंटाळल्यामुळे प्रत्येकजण गावाकडे जाण्यास उत्सुक आहे.
सध्या तालुक्यातील उचत -३, म्हाळसवडे -३, सांबू -२, शित्तूर तर्फ मलकापूर -१, परखंदळे -१, माणगाव -१, केर्ले -१, कपाशी -१, पाटेवाडी -१, शित्तूर-वारुण -१, वालूर -१, जांभळेवाडी -१ असे १३ गावातील १७ जण कोरोनाग्रस्त झाले आहेत.
एकंदरीत येणाऱ्या जनतेने तपासणी करून आल्यास या कोरोना चा प्रसार ग्रामीण भागात होणार नाही.