शाहुवाडी तालुक्यात कोरोनाबाधित तरुण : ३कि.मी. परिसर सील
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील उचत इथं ३४ वर्षाचा तरुण कोरोना बाधित असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. सध्या उचत पासून ३ किलोमीटर चा भाग सील करण्यात आला आहे. हे गाव मलकापूर नगरपरिषद पासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर आहे.
शाहुवाडी तालुक्यातील हि पहिलीच घटना असून,हा तरुण तबलीग मंडळींच्या संपर्कात आला होता. त्याच्या कुटुंबियांना देखील तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे समजते.
या घटनेमुळे पोलीस आणि प्रशासन यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. सहा. पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख सील केलेल्या परिसरावर कडकपणे लक्ष ठेवून आहेत.