शाहुवाडी तालुक्यात गाव चलो अभियानास सुरुवात
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं भारतीय जनता पार्टी च्या वतीने ” गाव चलो अभियान ” ची सुरुवात करण्यात आली आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा भाजपा ग्रामीण पूर्व चे जिल्हा सरचिटणीस श्री शहाजी भोसले यांनी दिली.
बांबवडे येथील गणेश नगर येथील ७ / १२ हॉल मध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप चे शाहुवाडी तालुका प्रमुख पांडुरंग वग्रे होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस श्री भोसले पुढे म्हणाले कि, देशात सध्या भारतीय जनता पार्टी साठी पोषक वातावरण आहे. विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आगामी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी तन मन धनाने पक्ष वाढविण्याचे काम करावे. गावोगावी भेटी देवून, ग्रामीण पातळीवर भाजप संघटन वाढवावे.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना तालुकाध्यक्ष श्री पांडुरंग वग्रे म्हणाले कि, भारतीय जनता पार्टी हा सध्या देशातील नंबर वन चा पक्ष आहे. मला मिळालेल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सदर चा पक्ष गावोगावी वाढविण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.
यावेळी मलकापूर चे नगराध्यक्ष श्री अमोल केसरकर, जिल्हा चिटणीस विजय रेडेकर, शाहुवाडी तालुका पक्ष विस्तारक श्री राजेंद्र पाटील, दाजी चौगुले, संजय खोत, विनायक पाटील, अशोक कुंभार, सचिन पाटील, सुनील वाणी, संपत भोसले, विवेक कुलकर्णी , रोहित पास्ते, सचिन सोसटे, हरिभाऊ पाटील, रामचंद्र शेळके, मुकुंद पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.