शाहुवाडी तालुक्यात दहावी च्या कॉपी मुक्त परीक्षेसाठी भरारी पथकासह बैठे पथक : गटशिक्षणाधिकारी
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्टे ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यावतीने दहावीची परीक्षा येत्या १५ मार्च पासून परीक्षा सुरु होत आहेत.

सन २०२१-२२ सालात होणाऱ्या दहावी च्या परीक्षांसाठी तालुक्यातून १७१९ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. शिक्षण विभागाकडून कॉपी मुक्त परीक्षांसाठी भरारी पथकासह बैठे पथक सुद्धा निर्माण करण्यात आले आहे. तसेच जिथे शाळा तिथेच परीक्षा केंद्रे निर्माण करण्यात आले आहेत. अशी माहिती गटशिक्षण अधिकारी नंदकुमार शेळके यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

या परीक्षा मंगळवार दिनांक १५ मार्च पासून ४ एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहेत.