शाहुवाडी तालुक्यात पावसाची हजेरी
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात वळवाच्या पावसाने दु.४.०० वाजनेच्या दरम्यान हजेरी लावली आहे. एकीकडे असह्य उकाडा वाढत असताना, वळवाच्या पावसाने लावलेली हजेरी तालुकावासीयांना सुखावून गेली आहे.

शाहुवाडी तालुक्यात बांबवडे, सरूड, शाहुवाडी, मलकापूर परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान म्हणावा तेवढा जोर पावसाला नसला, तरी पावसाने लावलेली हजेरी शेतकरी वर्गाला ,तसेच ग्रामस्थांना सुखावत आहे.

याच पद्धतीने कोल्हापूर शहर, इचलकरंजी परिसरातही पावसाने हजेरी लावल्याचे समजते.

खऱ्या अर्थाने हा वळवाचा पाऊस म्हणता येणार नाही. कारण वळवाच्या पावसात असलेले वारे ,इथं पाहायला मिळालेले नाहीत. विजा अधून मधून चमकत होत्या. पण खऱ्या अर्थाने पावसाची हजेरी, गरजेचीच होती. कारण पशु-पक्षी यांना पाणी उपलब्ध नसल्याने, ते कासावीस झाले होते. निदान पक्ष्यांपुरते पाणी उपलब्ध व्हावे , हि अपेक्षा.