शाहुवाडी तालुक्यात पावसाची यथेच्छ बॅटींग
बांबवडे : गेले पाच दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शाहुवाडी तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे. तसेच तालुक्यातील धरणे भरून ओसंडून वाहत आहेत.


चांदोली धरणातून केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वारणा, कडवी नद्या पात्राबाहेर पडल्या असून, अनेक पूल पाण्याखाली जाण्याच्या बेतात आहेत. भेडसगाव – बिळाशी पुलाला घासून वारणा नदी वाहत आहे. तर कडवी नदी पात्राबाहेर पडली आहे. दरम्यान सरूड येथील कडवी नदीच्या पुलावरील रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत.
दरम्यान भेडसगाव – बिळाशी पुलाजवळ सुद्धा खड्डे पडले आहेत. तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे करंजफेण येथील धावडा खिंडीत भूस्खलन झाले आहे.


एकंदरीत शाहुवाडी तालुक्यात पावसाने यथेच्छ बॅटींग केल्याचे निदर्शनास येत आहे.