शाहुवाडी तालुक्यात पुन्हा दोन पॉझीटीव्ह : १ केर्ली, तर १ माणगाव, रुग्ण
मलकापूर ( संतोष कुंभार यांजकडून ) : शाहुवाडी तालुक्यात पुन्हा एकदा दोन पॉझीटीव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. एकीकडे तालुका कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असताना, या दोन पॉझीटीव्ह रुग्णांमुळे तालुक्यात गांभीर्याचे वातावरण निर्माण होवू लागले आहे. अशी परिस्थिती असताना बांबवडे इथं मात्र नागरिक आणि व्यापारी दोघेही निष्काळजी पणे वागत आहे. यामध्ये बांबवडे कोरोना समितीने मात्र या लोकांसमोर हात टेकल्याचे दिसून येत आहे.
निष्पन्न झालेल्या रुग्णांपैकी एक आंबा येथील केर्ली चा, तर एक माणगाव येथील आहे.