शाहुवाडी तालुक्यात मोसमी पूर्व पावसामुळे तालुका सुखावला
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यात मोसमी पूर्व पावसामुळे जनतेला उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.

यंदाचा उन्हाळा खूप कडक होता. त्यामुळे जनतेला कधी नव्हे तो उन्हाचा भयंकर त्रास झाला. जनतेसह प्राणिमात्राला सुद्धा या उन्हाचा तडाखा बसला आहे. पशु पक्षी यांना सुद्धा पाणी मिळेनासे झाले होते.

परंतु काल दि.२० मे रोजी झालेल्या मोसमी पूर्व पावसाने धरणीमाते सह पशुपक्षांना सुद्धा दिलासा मिळाला. उन्हापासून होणारी काहिली थांबली. या मोसमी पूर्व पावसामुळे पावसाच्या मोसमाची चाहूल शेतकऱ्याला लागली. आत्ता शेतकरी पेरणी च्या कामाला लागेल.